Recipe - झटपट चिकन मसाला

Views : 24682 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

५०० ग्रॅम मध्यम आकाराचे चिकनचे तुकडे, ४ मध्यम कांदे, १ टी स्पून लसूण पेस्ट, १ टीस्पून आलं पेस्ट, १ टेबलस्पून गरम मसाला, २ टेबलस्पून कोल्हापूरी चटणी, हळद, मीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • प्रथम चिकनचे तुकडे स्वच्छ करुन पाणी काढून टाकणे.
  • नंतर हळद, मीठ, आलं, लसूण पेस्ट, गरम मसाला, कोल्हापूरी चटणी हे सर्व साहित्य चिकनला लावून ठेवणे.
  • नंतर कढईत तेल टाकून गरम करणे त्यात बारीक चिरलेले कांदे टाकणे, गुलाबी रंग आल्यावर मसाला लावलेलं चिकन त्यात टाकून वर झाकण ठेवून शिजवून घेणे.
  • शिजल्यावर गॅस बंद करुन कोथिंबीर टाकणे.
  • झटपट चिकन तात्काळ तयार होईल.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.