Recipe - वांग्याचे भरीत

Views : 17338 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

२ कोवळी वांगी, ६ लसून पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, अर्धा वाटी आल्याचे तुकडे, अर्धा वाटी तांदळाचे पीठ, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा लिंबू रस, एक वाट घट्ट दही.

लागणारा वेळ (Time) :

४५ मिनिटे

कृती (Procedure) :

१) वांग्याच्या पातळ चकत्या कराव्यात क़िवा वांगी मोठी असली तर एकाचे दोन भाग करून चकत्या कराव्यात.
२) आल मिरचीचे वाटप करावे नंतर हे वाटण,मीठ,लिंबाचा रस वांग्याच्या चकत्यांना लावावे
३) त्या चकत्या तांदळाच्या पिठात बुडवून तव्यावर तेल घालून परतून घ्याव्यात.
४) त्या चकत्या थंड झाल्यावर दह्यात मीठ,साखर घालून ढवळून घ्यावे.
५) चकत्यांवर दही,कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.