Recipe - चविष्ट आणि चटकदार कोशिंबीर

Views : 6780 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

१ वाटी मोड आलेले मुग, अर्धी वाटी घट्ट दही, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ ,१ चमचा साखर, ४ चमचे तेल, पाव चमचा लाल तिखट किंवा पाव चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा जिरे

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • कढई मंद आचेवर ठेवून तेल टाकून गरम झाल्यावर खाली उतरवून त्यात तिखट किंवा काळी मिरीपूड घालावी.
  • त्यात मुग घालून पुन्हा कढई मंद आचेवर ठेवावी.
  • २-३ मिनिटे परतून त्यात मीठ घालून कढई खाली उतरून ठेवून मुग गार होऊ द्यावेत.
  • जिरे भाजून त्याची पूड करावी, दही थोडे फेटुन घ्यावे.
  • त्यात कोथिंबीर, मीठ, साखर, जिरेपूड घालून एकत्र करावे.
  • नंतर मुग घालून एकत्र करावे.
ही कोशिंबीर पौष्टीक तर आहेच शिवाय चवही छान लागते.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.