Recipe - तंदुरी चिकन

Views : 16444 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

एक किलो चिकन, ११-१२ लसूण पाकळ्या, एक इंच आले, एक कांदा, दोन टेबलस्पून मिरचीपूड, एक चमचा काश्मिरी मिरचीपूड, अर्धा चमचा धणेपूड, एक चमचा जिरेपूड, एक चमचा गरम मसाला, दोन टेबलस्पून व्हिनेगर, दोन लिंबू, दोन चमचे तूप, मीठ, थोडा लाल रंग ( फूड कलर ), पाव कप दही, एक लहान तुकडा कच्ची पापी पपई.

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • आले, लसुन, कांदा वाटून रस काढून घ्यावा.
  • दही फेटून त्यात आले, लसूण यांचा रस, धनेपूड, जिरेपूड, दोन्ही प्रकारच्या मिरचीपूड, पपईची पेस्ट, मीठ, व्हिनेगर, लिंबूरस, फूडकलर फेटून घ्यावे.
  • नंतर फेट्लेला दही मसाला चिकनला आतून बाहेरून चोळावा. मसाला मुरण्यासाठी चिकन चार साडेचार तास तसेच झाकून ठेवावे.
  • नंतर शेगडीवर भाजावे. शेगडीच्या दोन्ही बाजूला शेगडीपेक्षा २-३ इंच उंच कोणत्याही पेट्या ठेवाव्या, त्यावर सळईवरील चिकन ठेवून फिरवून फिरवून २०-२५ मिनिटे भाजावे.
  • चिकन शिजले, मऊ झाले की, त्यावर गरम केलेले तूप ओतावे वरून गरम मसाला भुरभुरावा.
  • सळईमधून चिकन काढून प्लेटमध्ये ठेवावे.
  • लिंबाच्या चकत्या, कांद्याच्या रिंग्ज, पुदिना चटणीबरोबर तंदुरी चिकन खाण्यास द्यावे.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.