Recipe - सुरमई फ्राय

Views : 12535 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

अर्धा किलो सुरमई, १-२ चिंच, १०-१२ लसूण पाकळ्या, १ इंच आलं, १ चमचा लाल तिखट, हळद, मीठ, १ वाटी ज्वारीचे पीठ, रवा ( गरजेनुसार ), तेल.

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • सुरमईचे सगळे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत. चिंचेचा कोळ काढून घ्यावा.
  • चिंचेचा कोळ, वाटलेलं आलं, लसूण, हळद, १ चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ सर्व एकत्र करून सुरमईच्या तुकड्यांना सर्व बाजूने चोळून घ्यावे व ३-४ तास झाकून ठेवावे.
  • फ्राय करायच्या वेळी ज्वारीच्या पिठात रवा मिक्स करून नंतर सर्व तुकडे लावलेल्या मसाल्यासकट दोन्ही बाजूने घोळवून फ्रायिंग पॅनमध्ये पुरेसे तेल घालून एका वेळेला २-३ तुकडे लावून दोन्ही बाजूने खरपूस तळावेत.
  • गरमागरम सुरमई फ्राय सर्व्ह करण्यासाठी तयार असतील.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.