Recipe - सोलकढी

Views : 18091 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

१ खवलेला नारळ, ४-५ लसून पाकळ्या, ७-८ सुकी आमसूल, १-२ हिरवी मिरची, जीर पूड, मीठ चवीनुसार, कोथिंबीर सजावटीसाठी, १/४ कप आंबट ताक.

लागणारा वेळ (Time) :

30 min

कृती (Procedure) :

  • प्रथम ५-६ आमसूल १ १/२ कप गरम पाण्यात २५-३० मिनिटे भिजत ठेवून नंतर त्याला कुस्करून ते पाणी गाळून कोकम रस करून घ्या.
  • नंतर २-३ आमसूल, खवलेला नारळ, मिरची, लसून आणि चवीपुरते मीठ मिक्सर मधून वाटून घ्या. मग त्या मिश्रणाला २ कप पाणी टाकून चाळणीने गाळून घ्या. पुन्हा त्यात २ कप पाणी टाकून गाळून घ्या.
  • त्यात आता ताक आणि वरील कोकम रस टाकून ढवळा आणि थंड करणास फ्रीज मध्ये ठेवा.सर्व्ह करताना कोथिबीर टाका आणि जीर पूड भुरभुरा. (जीर पूड सर्व्ह करताना टाका, नाही तर सोल कढीचा रंग बदलेल.)
  • अशाप्रकारे तुमची झटपट सोलकढी तयार होईल.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.