Recipe - साबुदाणा वडा

Views : 10134 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

१ कप साबुदाणे, २ मोठे बटाटे उकडून, ५-६ तिखट हिरव्या मिरच्या, १/२ टिस्पून जीरे, १/४ ते १/२ कप शेंगदाण्याचा कूट, १/२ लिंबाचा रस, चवीपुरते मीठ, वडे तळण्यासाठी तेल

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • साबुदाणे पाण्यात भिजवावे. उरलेले पाणी काढून टाकावे. झाकण ठेवून ४ ते ५ तास भिजत ठेवावेत.
  • शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
  • मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात.
  • शेंगदाणे भाजून त्याची साले काढावीत आणि मिक्सरवर भरडसर बारीक करावेत.
  • भिजवलेले साबुदाणे, बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.
  • भिजवलेल्या मिश्राणाचे छोटे गोळे तयार करावेत. कढईत तेल गरम करावे आणि मीडियम हाय गॅस वर गोल्डन ब्राउन तळावेत
  • उपवासाची नारळाची चटणी बरोबर गरम गरम खायला द्यावेत.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.