Recipe - पाटवड्या

Views : 21581 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

•दोन वाटी बेसन पीठ
•अर्धी वाटी किसलेले सुखे खोबरे
•अर्धी वाटी चिरलेली कोथंबीर
•एक चमचा खसखस
•एक छोटा चमचा कांदा-लसून मसाला
•मीठ
•दोन चमचे तेल.

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • दोन चमचे तेलाची फोडणी द्या, अर्धी फोडणी वाटीत काढून घ्या आणि उरलेल्या फोडणीत दोन वाट्या पाणी घाला.
  • पाण्याला उकळी आणा नंतर बेसन पीठ, मीठ एकत्र करून घ्या व उकळलेल्या पाण्यात बेसनपीठ घालून पळीने घोटा.
  • पिठाच्या गुठल्या मोडून घेउन नंतर झाकन ठेऊन दणदणीत वाफ आणा.
  • ताटाला तेल लावून ताटात पीठ थापावे.
  • एक चमचा तेल कढत करून त्यात खोबर, कोथंबीर, खसखस, काला मसाला, मीठ घालून लालसर परतावे. ताटात थापलेल्या पीठावर हा मसाला पसरावा व शंकरपाळीच्या आकाराच्या मोठया वड्या कापा.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.