Recipe - पनीर पुलाव

Views : 23720 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

  • २ वाटी तांदूळ
  • २५० ग्रॅम पनीर
  • १ वाटी मटार सोललेले
  • २ टॉमेटो
  • २ हिरव्या मिरच्या
  • मीठ चवीप्रमाणे
  • १/२ लहान चमचा गरम मसाला
  • २ तुकडे दालचिनी
  • २ मोठे चमचे तूप.

लागणारा वेळ (Time) :

30 min

कृती (Procedure) :

  • तांदूळ धूऊन १५ मिनीटे भिजवा व तोपर्यंत पनीर चौकोनी चिरुन घ्या.
  • टॉमेटो मिक्सरमधून काढा. हिरवी मिरची बारीक चिरा. दालचिनी बारीक वाटून घ्या.
  • एका कढईत तूप गरम करून दालचिनी गरम मसाला टाका. याच्यात टॉमेटो पेस्ट व चिरलेली हिरवी मिरची टाकूण परता.
  • टॉमेटो चांगला परतल्यावर पनीर, मटार, तांदूळ व ४ कप पाणी टाका. गॅस कमी करून झाकून शिजवा.
  • तांदूळ शिजल्यावर गॅस बंद करा व दह्याबरोबर सर्व्ह करा.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.