Recipe - मूग डाळीचा हलवा

Views : 17407 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

• दोन वाट्या साखर
• दोन वाट्या मूगाची डाळ
• दोन वाट्या दूध
• दोन वाट्या तूप
• आठ वेलदोडे पावडर
• काजू-बेदाणे-पिस्ते.

लागणारा वेळ (Time) :

१ तास

कृती (Procedure) :

१) मूगाची डाळ चार तास पाण्यात भिजत ठेवा.
२) चार तासानंतर चाळनित उपसा.
३) पाणी पूर्ण गेल्यानंतर मिक्स़रमधून वाटून घ्या.
४) (पाणी न घालता ) वेलदोड्याची पूड करून घ्या.
५) काजू उभे चिरून घ्या.
६) बदाम पाण्यात भिजत घालून साल काडून उभे काप करा.
७) कढईत तूप घेउन त्यावर वाटलेली मूगाची डाळ घालावी व तांबूस होईपर्यंत परतावी.
८) तांबूस झाल्यावर बाजूला ठेवा.
९) दूध साखर एकत्र करून उकला व डाळीवर ओतून परत गैसवर परता.
१०) गैस मंद ठेवून सारखे परतत रहावे.
११) वेलची पूड घाला व दूध पूर्ण आटल्यानंतर बदाम ,काजू घालून खाली उतरवा.
१२) हा पौष्टिक पण आहे शिवाय पित्त कमी करतो.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.