Recipe - आंबे सांसव

Views : 5002 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

सहा-सात छोटे पिकलेले आंबे, दोन वाट्या ओले खोबरे, 7-8 लाल मिरच्या किंवा एक मोठा चमचा लाल तिखट, चिमुटभर मोहरी, दोन-तीन काळी मिरी, पाव चमचा हळद, साधारण अर्धी वाटी गूळ, मीठ, फोडणीचे साहित्य

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

एका पातेल्यात आंब्याची साले काढून कोयी मुरडून घ्याव्यात. कोयी टाकून न देता त्यातच ठेवाव्यात. सालीचा रसही थोडे पाणी घालून निपटून काढावा. मोहरी तव्यावर कोरडीच भाजून घ्यावी. (वर वाटी ठेवावी.) ओले खोबरे, मिरच्या, हळद, मिरी दाणे, मोहरी मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यावे. कढईत तेलावर जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. तडतडल्यावर आंब्याचा रस कोयींसकट कढईत ओतावा. थोडे ढवळून खोबर्‍याचे वाटण त्यात घालावे. लागल्यास थोडे पाणी घालावे. उकळी आल्यावर चवीनुसार मीठ, गूळ घालावा. याची चव आंबट-गोड-तिखट अशी यायला हवी. तिखट-गुळाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. फार पातळ वा फार दाट करू नये. हे गरमागरम सांसव पोळी, भात कशाही बरोबर छान लागतं.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.