Recipe - मक्खनी एग बिर्याणी

Views : 13078 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

सात-आठ अंडी, अडीच वाट्या बासमती तांदूळ, दोन चिरलेले कांदे, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर व हिरवी मिरची, एक लहान चमचा काळेमिरी पूड, पाव वाटी सुका मेवा, एक मोठा चमचा लोणी, दोन मोठे चमचे तेल, अर्धा मोठा चमचा किसलेलं आलं व लसूण, एक-दोन तमालपत्र, दोन-तीन मसाला वेलची, दोन सुक्या लाल मिरच्या, मीठ.

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • तांदूळ धुवून पाण्यात भिजत ठेवा. अर्धा चमचा तेल गरम करून तमालपत्र व सुकी लाल मिरची टाकून तडतडवा.
  • लाल मिरच्या बाहेर काढून घ्या. मसाला वेलचीची फोडणी देऊन गाळलेले तांदूळ त्यात मिसळा व चार वाट्या पाणी टाकून मोकळा भात शिजवा.
  • दोन अंडी उकळा. भातात लोणी टाकून मंद आचेवर शिजवा. तेल गरम करा.
  • साय त्यात मिसळून तेल सुटू लागले की चिरलेले टोमॅटो व कोळंबी घालून नीट परतावे व मीठ घालून शिजू द्यावे.चिरलेला कांदा, किसलेलं आलं व लसूण टाकून गुलाबी करा.
  • अंडी फोडून टाका व मीठ, काळेमिरी पूड टाकून परता. चिरलेली हिरवी मिरची, कोथिम्बिर, मेवा व लाल मिरची पूड मिसळा.
  • कोणत्याही मोल्डमध्ये आधी भात, मग अंड्याचं मिश्रण, पुन्हा भाताचा थर लावा व सर्व्हिंग डिशमध्ये मोल्ड उलटा.
  • उरलेली अंडी कापून सजवा व मक्खनी एग बिर्याणी खायला द्या.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.