Recipe - लाल भोपळ्याची भाजी

Views : 1690 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

५०० ग्रॅम लाल भोपळा, पाव वाटी हरभऱ्याची डाळ, एका मोठ्या लिंबा एवढी चिंच , २ कांदे, २ टोमॅटो, ५-६ मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या, १ इंच आले, १ चमचा धनेपूड, १ चमचा गरम मसाला, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर , मीठ, कडीपत्ता

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • भोपळ्याच्या मोठ्या चोकोनी फोडी कराव्या.
  • डाळ शिजवून घ्यावी. नंतर डाळीतील पाणी बाजूला करून डाळ वाटून घ्यावी.
  • भोपळा अर्धवट शिजवून घ्यावा.
  • तेलाची जिरे व हळद घालून फोडणी करावी.
  • त्यावर वाटलेले आले, लसूण व कांदा घालून परतावे.
  • मिरच्या उभ्या चिरून घालाव्या. टोमॅटो व धनेपूड घालावी.
  • कडीपत्ता, मीठ व वाटलेली डाळ घालावी.
  • डाळीतील पाणी व भोपळ्याच्या फोडी घालाव्या.
  • जरा वेळ उकळावे.
  • भोपळा शिजला की गरम मसाला घालावा.
  • अलगद हाताने ढवळावे व उतरवावे.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.