Recipe - अंडा करी

Views : 24026 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

२ उकडलेली अंडी (कवच काढून), २ उकडलेले बटाटे, टोमॅटो, कांद्याची पेस्ट, आल-लसून पेस्ट, १/४ टीस्पून साखर, १/२ टीस्पून जीरे, १/४ कप दुध, १/४ टीस्पून काश्मिरी मिरची पावडर, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून धणे- जिरे पूड, ६ काजू , १/२ टीस्पून गरम मसाला पावडर, १/२ टीस्पून किचन किंग मसाला, १/२ टीस्पून खसखस, २ टीस्पून तूप, १ पेजपण, २ लवंग, १/२ कांडी दालचिनी, मीठ चवीनुसार.

लागणारा वेळ (Time) :

40-50 min

कृती (Procedure) :

  • काजू गरम पाण्यात थोडया वेळ भिजवत ठेवा. नंतर काजू आणि खसखसची पेस्ट करून घ्या.
  • एका कढईत तेल तापत ठेवा. त्यात पेजपान, लवंग, दालचिनी आणि जीरे टाका.
  • जीरे तडतडलायला लागल्यावर त्यात आल-लसून पेस्ट, कांद्याची पेस्ट टाका. कांदा तेलात गुलाबी होई पर्यत परता.
  • नंतर त्यात टोमॅटो पेस्ट, हळद, धन-जीरपूड, काश्मिरी मिरची पावडर, किचन किंग मसाला,साखर टाका.झाकण ठेवून एक वाफ आणा.
  • मिश्रणाला तेल सुटले कि त्यात काजू-खसखस पेस्ट, मीठ, गरम मसाला, दुध टाका.
  • २ मिनिटांनी त्यात अंडी(अंड्यांना मध्ये काप दया), बटाटे घाला आणि आवश्यक असल्यास पाणी घाला. उकळी आल्यावर आच घालवा.
  • आता त्यावर तूप सोडा आणि कोथिबीरने सजवा.
  • चपाती/रोटी/भाता सोबत सर्व्ह करा

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.