Recipe - डाळीची वांगी
साहित्य (Ingradients):
३ वाट्या हरभरा डाळ, १ अर्धी वाटी सुक खोबर, १ वाटी कोथिंबीर बारीक चिरून, १ चमचा खसखस, १ चमचा कांदा लसून मसाला, मीठ, ३ डाव तेल, हळद
लागणारा वेळ (Time) :
अर्ध तास
कृती (Procedure) :
• हरभरा डाळ ४ तास भिजवून बारीक वाटून घ्यावी.
• कुकरवर चाळणी ठेवून डाळीचे मुटके उकडून घ्यावेत (मुटके वांग्याच्या आकाराचे करावेत)
• उकडून थंड झालेल्या मुटक्यांना वांग्यासारखे मध्ये चार काप द्यावेत.
• दोन पळ्या तेल फोडणीसाठी ठेवावे.
• तेल तापल्यावर हळद, खसखस, खोबर, कोथिंबीर, मीठ, मसाला घालून खोबर लाल होईपर्यंत परतावे.
• हा मसाला काप दिलेल्या वांग्यामध्ये भरून एक डाव तेल कडकडीत करून वरून फोडणी ओतावी.