Recipe - चिकन बिरयानी

Views : 26161 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

  • ५०० ग्रा. चिकन तुकडे
  • १ कप बासमती तांदूळ
  • २ मोठे चमचे तेल
  • १ कापलेला कांदा
  • २ कांडी लसूण सोललेली
  • १ हिरवी मिरची कापलेली
  • २ चमचे चिकन मसाला
  • १ तुकडा आले कापलेले
  • १ चमचा मीठ चवीनुसार
  • १/२ चमचा गरम मसाला
  • ३ कापलेले टोमॅटो
  • १/२ चमचा हळद
  • २ तेजपत्ते
  • ४ छोटी वेलची
  • ४ लवंग
  • १ चमचा केसर

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवावे.
  • एका कढईत तेल गरम करून कांदा भाजत नंतर लसुण, आले व हिरवी मिरची टाकुन दोन मिनीट फ्राय करावे चिकन टाकावे व ३ मिनीट फ्राय करावे.
  • चिकन मसाला मीठ आणि गरम मसाला टाकुन ५ मिनीट फ्राय करावे नंतर टोमॅटो टाकुन ३-४ मिनीट अजुन भाजावे नंतर उतरवुन एका बाजुला ठेवावे.
  • एका दुसर्‍या कढईत तांदूळ, ३ कप पाणी हळद, तेजपान, वेलची, लवंग आणि केसर टाकुन पाणी सुकेपर्यंत शिजवावे.
  • शिजलेल्या तांदळात चिकन टाकुन अलगद मिळवावे आणि कमी गॅसवर ८-१० मिनीट ठेवावे व गॅस बंद करावा.
  • अशा प्रकारे तुमची बिरयानी तयार आहे.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.