Recipe - भरली अंडी

Views : 24065 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

६ अंडी, अर्धा नारळ, १ वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, ३ कांदे, २ बटाटे, ४-५ लसूण पाकळ्या, ६ सूक्या मिरच्या, १ चमचा खसखस, गरम मासाला, मीठ, हळद, तेल.

लागणारा वेळ (Time) :

40-50 min

कृती (Procedure) :

  • अंडी उकडून घ्यावी.नंतर सोलून वरच्या बाजूने दोन चिरा देऊन भरण्यासाठी तयार करून ठेवावी.
  • बटाटे उकडून घ्यावे. कांदे बारीक चिरावे.
  • मिरच्या लसूण वाटावे. नारळाचे दुध काढावे. सुके खोबरे भजावे व वाटावे.
  • थोड्या तेलावर कांदा भाजून घ्यावा. त्यातच गरम मसाला, मीठ व हळद, वाटलेले खोबरे, मिरच्या, लसूण पेस्ट घालावी व उतरवावे.
  • त्यात खसखस वाटून घालावी. मीठ व थोडे लाल तिखट घालावे.
  • अंड्यात भरल्या नंतर उरलेला मसाला नारळाच्या दुधात घालावा. उकडलेल्या बटाट्याच्या फोडी व भरलेली अंडी नारळाच्या दुधात सोडावी.
  • मंदाग्नीवर जरा वेळ उकळी येऊ द्यावी. नंतर गरचम वाढावी.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.