Recipe - बटाट्याची सुकी भाजी

Views : 10285 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

६ मध्यम बटाटे, ४ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून,१/२ टेबल स्पून उडीद डाळ, १/२ टेबल स्पून आलेपेस्ट,१/४ कप कोथिंबीर बारीक चिरून,१ टेबल स्पून लिंबाचा रस फोडणीसाठी: २ टेबल स्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/४ टेबल स्पून जिरे, १/८ टेबल स्पून हिंग, १/४ टेबल स्पून हळद

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • बटाटे उकडून आणि सोलून घ्यावेत.
  • बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, घालून फोडणी करावी. उडीद डाळ घालून ती गुलाबीसर होईपर्यंत परतावी .
  • नंतर आलेपेस्ट, मिरच्या आणि कढीपत्ता घालून काहीवेळ परतावे. नंतर कोथिंबीर घालून ५ ते १० सेकंद परतावे. आणि बटाट्याच्या फोडी घालाव्यात.निट परतावे
  • चवीपुरते मीठ घालावे.>कढईवर झाकण ठेवून ५ ते ७ मिनीटे मध्यम आचेवर वाफ काढावी.
  • लिंबाचा रस घालून मिक्स करावे. कोथिंबीर घालून सजवावे. गरम गरम बटाट्याची भाजी, पुरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.
तिखटपणासाठी गरजेनुसार मिरच्या वापराव्यात.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.