Recipe - बांगडा फ्राय

Views : 18968 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

५ बांगडे, तिखट, मीठ, हळद, ३ टेबलस्पून बारीक रवा, २ टेबलस्पून तांदळाचे पीठ, २ टेबलस्पून कोकमाचे आगळ, तेल.

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • प्रथम बांगडा साफ करून धुवून घ्या. नंतर बांगड्याला सुरीने आडव्या चिरा द्या.
  • नंतर कोकमाचे आगळ, १ चमचा तिखट, चिमुटभर हळद, चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करून बांगडयास १५ मिनिटे लावून ठेवावे.
  • नंतर बारीक रवा, तांदळाचे पीठ, चिमुटभर हळद, २ टेबलस्पून तिखट, चवीनुसार मीठ या सर्वांचे सुके मिश्रण तयार करून बांगडयास लावून घ्यावे.
  • मग बांगडे नॉन स्टीक तव्यामध्ये दोन्ही बाजूने १०-१५ मिनिटे शालो फ्राय करून घ्यावेत.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.