Recipe - तिरंगी ब्रेड पकोडा
साहित्य (Ingradients):
४ ब्रेंड, ५० ग्राम पनीर किसलेलं, २-३ उकडलेले बटाटे, १/४ वाटी कोथिंबिरीची चटणी, १ छोटा टोमॅटो कापलेला, १ छोटा कांदा बारीक कापलेला, ५० ग्राम उकडलेले बटाटे आणि पेस्ट केलेले मटार, २-२ हिरव्या मिरच्या, तांबड तिखट १/४ छोटा चमचा चाटमसाला, ५० ग्राम रवा, १/४ छोटा चमचा कॉर्नफ्लॉवर, तळण्यासाठी तेल.
लागणारा वेळ (Time) :
30 min
कृती (Procedure) :
• पनीरमध्ये थोड मीठ,हिरवी मिरची मिसळून बाजूला ठेवावे.
• पेस्ट केलेल्या मटारमध्ये बारीक कापलेला टोमॅटो, कांदा, मीठ, चाट मसाला घालून बाजूला ठेवावे.
• बटाट्याच्या लगद्यात मीठ,कॉर्नफ्लॉवर,कोथिंबीर आणि लाल तिखट घालून बाजूला ठेवा.
• पकोडा बनवताना ब्रेडवर मटारच स्टफिंग लावून त्यावर दुसरा ब्रेड ठेऊन त्यावर पनीरच स्टफिंग लावून त्यावर पुन्हा ब्रेड ठेवावा.
• आता त्यावर कोथिंबिरीची चटणी लावून पुन्हा त्यावर एक ब्रेड ठेवा.
• या स्टफ केलेल्या चारीही ब्रेडवर बटाट्याची पेस्ट लावा म्हणजे त्यातून स्टफिंग बाहेर येणार नाही.
• आता त्याला रव्याच्या मिश्रणात बुडवून कढईत सोडावे.
• पकोडा तयार झाल्यावर चार भागात कापून सॉस बरोबर खायला द्या.